शब्दवैभव
🔥♨️(🇮🇳 #शब्दवैभव 🇮🇳)♨️🔥
'विश्वनेते' अस्वस्थ झालेत,
'Like' आणि 'Share' साठी,
चॅनल 'Subscribe' करा म्हणतात,
प्रत्येक नवीन अपडेटसाठी.!
तुमची अपडेट नको आम्हाला,
आमच्याही 'अपडेट' घेत जा...
सतत 'मन की बात' करता,
'काम की बात'ही करत जा.!️
मंत्रिमंडळ तुमचेच आहे,
सर्व खात्यांचे तुम्हीच प्रमुख...
आणखी किती प्रसिद्धी हवी,
जनतेला जरा मिळू द्या सुख.!
'बेरोजगार' आहेत लाखो तरुण,
कधीतरी त्यांच्याशी बोलत जा...
आणखी किती 'खोटं' बोलणार,
कधीतरी 'खरं' बोलत जा.!
काम करता एक रुपयाचे,
प्रसिद्धी करता शंभरची,
महागाईच्या भडक्याने,
झोप उडवली जनतेची.!
कृषी-पिकांना भाव नाही,
दयनीय अवस्था शेतकऱ्यांची,
खते-औषधांच्या किंमती वाढवून,
चांदी केली व्यापाऱ्यांची.!
'पस्तीस' रुपये करणार होते,
पेट्रोलने केली 'शंभरी' पार,
'काळे-धन' आणले नाहीच,
नागरिक मात्र केले बेजार.!
जाहिरातबाजीवर देश चालतो,
कंत्राटदारांवर चालते राज्य...
सर्वपक्षीय भ्रष्टाचारी झालेत,
तुमच्या सरकारचा भाग अविभाज्य.!
मणिपूर जळत असतांनाही,
तुम्ही राहिलात शांत...
जाती-धर्मात भांडणे लावून,
तुम्ही राहिलात निवांत.!
कोट्यावधींचे कर्ज बुडवून,
नाकावर टिचून पळून गेले,
56 इंच कोणाला दाखवता,
तुमचे नाव 'फेकू' झाले.!
नेते फोडले, पक्ष फोडले,
चालवले तुम्ही 'ईडी' सरकार,
'पार्टी विथ डिफरन्स' सांगता,
किती तुमचा 'बोगस' कारभार.?
क्लाऊड पासून 'रडार' वाचवले,
'गंदी नाली'तून काढला गॅस...
एक्स्ट्रा 2AB काढून दाखवला
गणित-विज्ञानाचा केवढा अभ्यास.?
तुम्ही 'चहा' विकलाच नाही,
विकल्या तुम्ही 'स्वायत्त संस्था',
तुम्ही कधी शिकलेच नाही,
शिकले तुम्ही फक्त 'जुमला'.!
सरकारी नोकऱ्या संपवल्या,
खाजगीकरणाचा घातला घाट,
जुनी पेन्शन बंद करून,
तरुण पिढीची लावली वाट.!
पत्रकार परिषदा टाळून तुम्ही,
न्यूज-चॅनेल विकत घेतले,
बोलाचीच कढी, बोलाचाच भात,
विदेश-दौरे करीत सुटले.!
राक्षसी बहुमत दिले तुम्हाला,
जनतेने केले आंधळे प्रेम,
ब्लॅकमेलिंगचे राजकारण करून,
विरोधकांचा तुम्ही केला गेम.!
'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून,
जनतेला तुम्ही लावला चुना,
उद्योगपतींना लोटांगण घालून,
पुन्हा सत्तेत म्हणतात आणा.!
फेल गेली 'नोटबंदी',
फेल गेल्या 'स्मार्ट-सिटी',
फेल गेले 'रोजगार धोरण',
फेल गेली 'शिक्षा-निती'.!
फर्जी आहे 'हिंदुत्व' तुमचे,
फर्जी आहे तुमची 'सत्ता'...
फर्जी आहे 'देशप्रेम' तुमचे,
फर्जी आहे 'नीतिमत्ता'.!
'सार्वभौम' आहे देश आपला,
तुमच्या पक्षाचा सातबारा नाही...
सत्तेला प्रश्न विचारत राहू,
टिकवायची आहे 'लोकशाही'.!✅️
©#'शब्द'वैभव.!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा